Uncategorized
नीलगाय शिकार प्रकरणात चौघांना जामीन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पोफाळी वनक्षेत्रात नीलगायची शिकार करून तिच्या मासाची वाटणी केल्याच्या गंभीर प्रकरणात अटकेत असलेल्या चार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात वनविभागाच्या चौकशीत आतापर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना १२ जानेवारी रोजी उंबरखेड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या प्रकरणातील आरोपींची नावे दत्ता रामचंद्र चव्हाण, पंडित मोहन चव्हाण, नामदेव नागोबा भिसे व चरण हरी राठोड (सर्व रा. संबंधित गाव) अशी आहेत. घटनेच्या दिवशी दोघांना अटक करण्यात आली होती, तर उर्वरित दोघांना नंतर अटक करण्यात आली.
वनविभागाने आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ५० व ५१ अन्वये कारवाई केली होती. प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.



