मंत्रालयात चपराश्या पासून ते नायब तहसीलदार महागाव येथे सेवानिवृत्त !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथे तहसील कार्यालयात जी .एम . राठोड नायब तहसीलदार हे पूर्वी मंत्रालयामध्ये चपराशी या पदावर कार्यरत होते परंतु जादूच्या कांडीमुळे ते प्रमोशन घेत नायब तहसीलदार या पदापर्यंत आले ! त्यांना महागाव येथे प्रभारी तहसीलदार पदाचा काही काळासाठी पदभार मिळाला होता ! त्यांना त्यांच्या अधिकाराची व कायद्याचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे फुलसांवगी हे गाव वर्ग १ मध्ये येत असल्यामुळे तिथे एनएपी करताना नगररचना विभाग नकाशा मंजूर व उपविभागीय अधिकारी ऊमरखेड यांनाच अधिकार असल्यामुळे प्रभारी तहसीलदार जी .एम . राठोड यांनी त्यांचे अधिकार वापरून फुलसांवगी येथे दोन एन ऐ ऑर्डर चिंतावर शेत सर्वे नंबर ६४ क्षेत्रफळ ५ .०४ या क्षेत्रफळाचे दोन एन ए पी -34-(४२ड) 25-1-2024 रोजी ऑर्डर केली होती त्यावरून तलाठी शेख व मंडल अधिकारी राम पंडित यांनी त्या आदेशावरून सातबारा सातबारा प्लॉटिंगचे केले होते ते नियम बाह्य व बेकायदेशीर होते त्याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांनी 22-5-2024 यांनी एन. ए .पी रद्द केले त्यानंतर त्यांची प्रत मंडल अधिकारी व पटवारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी कोणतेही प्लॉटचे झालेले फेरफार रद्द न केल्यामुळे अखेर तक्रार झाल्यावर एक वर्षानंतर उपविभागीय अधिकारी यांनी 29 5 25 रोजी संपूर्ण फेरफार रद्द करून एकच सातबारा करण्याचे आदेश पारित केले .अजून काही एनए केल्याचे आढळून आले आहे .त्यावर सुद्धा कारवाई होणार तरीसुद्धा मंडल अधिकारी राम पंडित व शेख तलाठी यांनी आदेशावरून सातबारा आजपर्यंत केला नाही हे विशेष ! त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पटवारी मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार हे जबाबदार आहेत .त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा विभागीय चौकशी बसणे गरजेचे आहे .उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले. अशा अधिकाऱ्याचा( जी एम राठोड ) यांचा दिनांक 30 6 2025 रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रमात तहसीलदार अभय मस्के महागाव लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय भगत, साप्ताहिक लोकचिंतन वृत्तपत्राचे संपादक गजानन वाघमारे, पत्रकार नंदू कावळे, पत्रकार पवन रावते देशोन्नती, प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते . सहकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ करण्यात आला. त्यामुळे “अशा कर्तबगार अधिकाऱ्यांचा” थाटामाटा फेटे बांधून निरोप समारंभ झाल्यामुळे हा निरोप सभारंभ महागांव तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.



