Uncategorized

लोअर पुस वेणी धरण अधीक्षक अभियंता व अभियंता साठी खुरण( त्यांनी घातला भ्रष्टाचाराचा कळस)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

( भाग 4) महागाव तालुक्यात आठ किलोमीटर अंतरावर लोअर पुस वेणी धरण असून त्या ठिकाणी सन 2013 पासू न अविनाश भगत अभियंता म्हणून आज पर्यंत काम करत आहे .त्यांनी उंबरखेड येथे कार्यरत असताना महागाव अभियंत्याचा चार्ज त्यांच्याकडे होता तसेच ते पुसदला गेले असता लोअर पुस वेणी धरण महागाव अभियंता चा प्रभार आजपर्यंत त्यांच्याकडे आहे .आता त्यांची बदली झाल्याने बदली कॅन्सल करण्यासाठी धावपळ सुरू आहे . लोअर पुस वेणी धरणाचे पाणी शेतकऱ्यासाठी शेती उपयोगी पाणी कॅनॉल ने झिरो ते टेल पर्यंत आज पर्यंत गेले नाही . हे विशेष आहे. आज पर्यंत तांत्रिक कारण दाखवून वेणी ते भोसा झालेले कॅंनवल दुरुस्तीच्या नावाखाली माती कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला .माती कामाचे कोणत्याही अधिकाऱ्याने पाहणी केली नाही त्याचा फायदा अभियान यांनी घेऊन पावसाळ्यामध्ये वाहून गेल्याचे अनेक वेळा सांगण्यात आले त्याच कामावर वर्षानुवर्ष कॅनॉल ची माती काढून भोस्यापर्यंत पाणी नेण्यासाठी कागदोपत्री कामे दाखवून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना कॅनॉलचे पाणी मिळाले नाही त्या कामाचे ऑडिट होत नसल्यामुळे अधीक्षक अभियंता यवतमाळ येथील पाटबंधारे विभाग चार यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाला आहे अविनाश भगत अभियंता यांनी वारंवार कामाचे इस्टिमेट बनवून अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक चार यवतमाळ यांच्याकडे पाठवून कामाचे टेंडर लावून मॅनेज होणारे ठेकेदार यांचे टेंडर मंजूर करून कामाची मंजुरात घेतली आहे.त्यामध्ये अमरावती पाटबंधारे विभाग नागपूर विभागीय पाटबंधारे येथील कार्यालयात असलेले अधिकारी यांना त्या कामाचे टक्के देऊन बिले काढून घेतली आहे का? त्यामध्ये यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता हा सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांची सुद्धा बदली झाल्याचे कळते सन 2024 मध्ये गेट मधी काडी कचरा अटकल्याने गेट उघडत नसल्याचे कारण दाखवून शेतकऱ्यासाठी व इतर गावातील लोकांना जनावरासाठी पाणी पिण्याची सोय होण्याकरता जिल्हा अधिकारी साहेब व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून जलपर्णी कामाचे मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपयाचे इस्टिमेट तयार करून अभियंता अविनाश भगत यांनी ते इस्टिमेट यवतमाळ येथे पाठवण्यात आले अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग-४ यवतमाळ येथून टेंडर लावून ते टेंडर मॅनेज करून त्या कामांमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे संगम मत असल्यामुळे त्या कामाला प्राधान्य व अति आवश्यक असल्याचे सेवा नागरिकांसाठी व जनावरांसाठी पाणी सोडण्याचे अति महत्त्वाचे कारण दाखवून यवतमाळ कार्यालयातून टेंडर तातडीने काढून मंजूर केले.सर्व अधिकाऱ्यांच्या संगनमताने ते टेंडर मंजूर झाले का? लोअर पुस वेणी येथील गेटमध्ये अडकलेला काडीकचरा जलपर्णीच्या नावाखाली टू टेन जेसीपी मशीन ने लाकडं व कचरा काढून गेटचे काम मोकळे केले ते काम फक्त पाच लाखात करण्यात आले बाकी सर्व पैसे ठेकेदाराच्या खात्यात अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागच्या -4 यवतमाळ यांनी वळती केल्याचे समजले नागपूर येथील पाटबंधारे विभागांनी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग यवतमाळ-४ यांच्या हेड खाली कामाची रक्कम टाकण्यात आली .त्या कामाचे त्यांना सुद्धा टक्के देण्यात आले का? त्यामध्ये अभियंता यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला. याबाबत तक्रार देण्यात आली जिल्हा अधिकारी मार्फत ई-मेल द्वारे पी एम ओ कार्यालय या तक्रारीची नोंद घेऊन दिनांक 5-6- 2025 रोजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग -4 यांच्याकडे तक्रार पाठवण्यात आली परंतु त्या कामांमध्ये कार्यकारी अभियंता यांचे संगणमत असल्याने चौकशी होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे टक्क्याने कामाचे पैसे मंजूर करून ठेकेदार यांच्या खात्यात टाकण्यात आले .त्यामुळे भ्रष्टाचाराच्या पैशात आपली बदली कॅन्सल कशी होईल त्या कामाची चौकशी समिती आली तरी मॅनेज करता येईल अशा तुऱ्यामध्ये अभियंता वावरत आहे. धरणावरून डोंगरगाव येथे जाण्याकरता तीस ते पस्तीस लाखाचा रोड मंजूर करण्यात आला वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती परंतु सहा वर्षांपासून ठेकेदाराने ते काम सोडून दिले त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याकरता पत्र सुद्धा देण्यात आले असे कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात लोअर पुस वेणी धरण येथे भ्रष्टाचार झाला आहे. तसेच मनुष्यबळ पुरवणे करता शासनाकडून वेळोवेळी लाखो रुपये उचल करून भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते तसेच कॅनॉलला पाणी आल्यावर जागोजाग पाणी सोडण्यासाठी गेटवर मनुष्यबळ लागतो परंतु त्यांच्या कार्यकाळात कुठेही मजुरा मार्फत काम न करता त्यांच्या नावाने शासनाकडून पैसे उचल करून भ्रष्टाचार केला आहे.त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी होणे गरजेचे आहे . त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तक्रारी झाल्या आहे .तसेच वृत्तपत्रांमध्ये वारंवार बातम्या प्रकाशित झाल्यामुळे अविनाश भगत हे कामाची चौकशी समिती येऊ देणार नाही का?सर्व अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील असल्यामुळे चौकशी समिती नेमू देणार नाही का? असे बोलत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांना लेखी तक्रार व काही पुरावे पाठवीत असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारात लाखो रुपयांची प्रॉपर्टी माया जमा केल्यामुळे लाच लुचपत विभाग यांच्याकडे सुद्ध तक्रार करत असल्याचे माहिती मिळाली आहे? त्यामुळे पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने झालेल्या सर्व कामाची चौकशी करावी करिता तक्रार दिल्याचे सांगण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button