डॉक्टरांवरील हल्लेखोरांची दिंड; महागाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाच आरोपी जेरबंद; मुख्य आरोपीसह चार जण जेलबंद

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, नर्सिंग ऑफिसर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करून रुग्णालय तसेच कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरमध्ये तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध महागाव पोलिसांनी कारवाई केली आहे. शेख इजराइल शेख शाबुद्दीन वय 28 वर्षे, प्रवीण उर्फ छकुला विलास कांबळे वय 28 वर्षयोगेश खंदारे, श्रीकांत देशमाने व 19 वर्ष योगेश खंदारे आणि एका विधीसंघर्ष बालकासह तीन आरोपींना २३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींची महागाव शहरातील व्यापारी पेठेतून धिंड काढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते.
मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता १० ते १२ जणांच्या टोळक्याने ग्रामीण रुग्णालयात धुडगूस घातला होता. हल्लेखोरांच्या दहशतीमुळे महिला डॉक्टर व परिचारिकांना बाथरूममध्ये लपून बसावे लागले होते. नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले होते. तसेच रुग्णालयातील साहित्य व कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरची तोडफोड करण्यात आली होती.
घटनेनंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर महागाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन आरोपींना जेरबंद केले.
ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम शेख, एपीआय सुनील अंबुरे, एपीआय किशोर मुरकुटे व पोलीस पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणातील इतर हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. “या प्रकरणातील कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही इतरांवरही आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली.



