भारतीय संगीताचे महान पार्श्वगायक स्वर्गीय मोहम्मद रफीक यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त हिमायतनगरमध्ये भावपूर्ण अभिवादन; मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची कलावंतांची आग्रही मागणी

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
भारतीय संगीतातील महान पार्श्वगायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या ४६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हिमायतनगर येथील संघर्ष सांस्कृतीक कला मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. प्रस्तुतकर्ता सय्यद अखिल यांच्या संचातील स्थानिक कलावंतांनी एकत्र येत रफी साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बातम्यातील प्रमुख मुद्दे:
संगीतमय श्रद्धांजली: कार्यक्रमादरम्यान स्थानिक गायकांनी मोहम्मद रफीक यांची लोकप्रिय गाणी सादर करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
’भारतरत्न’ पुरस्काराची मागणी: मोहम्मद रफीक यांनी हिंदीसह मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलगू व तमिळ अशा अनेक भाषांमध्ये २६ हजारहून अधिक गीते गायली आहेत. त्यांच्या या अजोड योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी आग्रही मागणी कलावंतांनी केली.
राष्ट्रपतींना निवेदन: रफी साहेबांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी कलावंतांच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी संघर्ष सांस्कृतीक कला मंडळाचे अध्यक्ष डॉ.दामोदर राठोड आणि उपाध्यक्ष उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सय्यद अखिल भाई यांच्या नियोजनाने व उपस्थितीत , रामेश्वर डांगे, शेख वकील भाई, परमेश्वर तिप्पनवार, मीरा जाधव पाटील,इरफान शेख,सचिन पवार,बाबूराव पाटील,अनिल तलवारे,ऐजास खान,सय्यद शोएब,शेख सलीम,जमीर सर,शेख अन्वर भाई, शेरे सर कळणे पाटील, अब्दुल अजीज पाशा खुरेशी, अब्दुल मतीन,
गायिका मीरा पाटील यांच्यासह हिमायतनगर शहरातील अनेक स्थानिक कलावंत व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



