Uncategorized

गुंज येथील दोन युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद!

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील गुंज येथील एका युवकांनी आपल्या बहिणीच्या अल्पवयीन मैत्रिणीला घरी आल्यावर बळजबरीने आपल्या मोबाईल मध्ये फोटो घेत एकतर्फी बळजबरी करीत सहा महिन्यापासून त्रास देत असल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीने 16 जून रोजी दिलेल्या फिर्यादी वरून युवका सह त्याच्या मित्रावर पोक्सो कायद्याअंतर्गत महागाव पोलीस स्टेशन येथे सोमवारी 16 जून रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

सहा महिन्यापूर्वी गुंज येथील एक सतरा वर्षीय विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीच्या घरी इयत्ता दहावीचे सप्लीमेंटरीचे फॉर्म भरण्यासाठी मैत्रिणीच्या घरी भेटण्यासाठी मैत्रिणीच्या घरी गेली असता ती घरी पोहोचताच मैत्रीण घरात नव्हती. घरामध्ये मैत्रिणीचा भाऊ आरोपी निलेश दिगंबर जोराळे, वय 24 वर्षे हा घरात आढळला. आपल्या बहिणीच्या मैत्रिणीवर त्याची वाईट नजर पडली. त्याने अल्पवयीन मुलीस हात धरून घरामध्ये नेत जबरदस्तीने त्याचे मोबाईल मध्ये फोटो काढले. मुलगी फोटो काढण्यासाठी नकार देत होती, परंतु निलेश हा तिचे काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सतत मुलीस तगादा लावत होता की तू माझ्याशी बोल तुझ्याशी मला लग्न करायचे आहे असे अमिष देत गुप्तांगावर हात लावुन घरात नेत जबरदस्ती केली. झालेल्या प्रकारानंतर अल्पवयीन मुलीने शाळेत फॉर्म भरून निघून गेली. घाबरून गेल्याने घरच्यांच्या भीतीने घडलेली घटना विद्यार्थिनीने घरच्यांना सांगितले नाही. आरोपी निलेश जारोळेने आपल्या मोबाईल वरून कॉल करीत आपल्या सोबत बोलण्यासाठी तगादा लावत होता. मुलगी त्यास नकार देत होती. सतत सहा महिन्यापासून तो कधीकधी घरासमोरून मोटरसायकल घेऊन येत मोटरसायकलचा हॉर्न वाजवीत चाळे करीत असल्याने त्याचा खूप त्रास वाढला होता. निलेश जोरोळेचा मित्र शुभम टेमकर वय 25 वर्ष याने पिडीतेस अनेक दिवसापासून रस्त्यावर कुठेही भेटात म्हणत होता की, तू माझ्या मित्राला (निलेश) का बोलत नाहीस तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू जर नाही बोललीस तर तुझे काहीच खरे नाही तुला आम्ही एखाद्या दिवशी सोडणार नाही, अशा प्रकारची मुलीस धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
3 जून 2025 रोजी मुलीचा खडका येथील योगेश अशोक भामकर यांचेशी साखरपुडा केला होता. त्या नंतर 15 जून 25 रोजी मावस भाऊ सागर वानखेडे रा. रोहडा ता. पुसद यांनी मुलीच्या घरी येऊन सांगितले की, योगेश अशोक भामकर यांनी फोन करून सांगितले निलेश जोरोळेंनी योगेश भामकर यास फोन करून सांगितले की हिचे सोबत तुझा साखरपुडा झाला आहे. माझे व प्रेम संबंध आहे. तू लग्न करू नको मी तिच्यासोबत लग्न करणार आहे असे सांगितले व योगेश भामकर यांनी लग्नास नकार दिल्याचे म्हटले आहे. निलेश दिगंबर जोरोळे आणि शुभम अनिल टेमकर यांनी मागील सहा महिन्यापासून सतत त्रास देत होते अशा अशा आशयाच्या तक्रारीवरून दोन्ही युवकावर
अपराध क्र. 319 / 2025 कलम 75, 77, 3(5) बी एन एस सह कलम 8,12 बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रंगराव राठोड यांनी दोन्ही युवकांना सोमवारी अटक करून पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!