Uncategorized

पेट्रोल पंपाची लिज वाढवून देऊ नये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीची मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या पेट्रोल पंपाची लीज ही येत्या 30 जून रोजी संपणार असून यावर 20 जून पर्यंत आक्षेप नोंदविण्याचे शासनाकडून सांगितले आहे .या वरदळीच्या ठिकाणी असणाऱ्या धोकादायक अशा पेट्रोल पंपला इथून हटविण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीने पुढाकार घेत शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले आहे .

1952 साली या पेट्रोल पंपाच्या जागेवर ब्रह्मा सेल प्राइवेट लिमिटेड कंपनीकडून सुरुवात करण्यात आली होती .त्यावेळी उमरखेड शहराची संख्या केवळ ५ हजार होती . त्यानंतर 1961 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही 12,674 झाली होती मात्र १९८२ ला उमरखेड तालुका घोषित झाल्याने शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली . शहराची लोकसंख्या पाहता या पेट्रोल पंपावर भर चौकामध्ये गर्दी ओसंडुन वाहू लागली . आज मात्र चौपट लोकसंख्या शहराची झाली असून या चौकातून जाताना नागरिकांना पेट्रोल पंपामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अगोदर थेट नगराध्यक्ष झालेले अमानऊल्ला जहागीरदार यांनी त्यांच्या कार्यकाळात या पेट्रोल पंपावर आक्षेप नोंदविला होता .त्यानंतर पुन्हा 2006 मध्ये थेट नगराध्यक्ष झालेले बाबा जहागीरदार यांनी या पेट्रोल पंपा विरोधात आक्षेप नोंदविला होता मात्र राजकीय दृष्ट्या दोन्ही वेळेस नगर अध्यक्षांच्या आक्षेपाला नजर अंदाज करण्यात आले होते . यावेळी मात्र 2020 मध्ये सदर पंपाची लिज संपायची होती . याही वेळेस नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते त्यानंतर या पेट्रोल पंप धारकाला पाच वर्षाची मुदतवाढ मिळाली होती . ती मुदतवाढ ही येत्या 30 जून रोजी संपत असून पुन्हा शासनाकडून नागरिकांना आक्षेप नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे . यावेळेस मात्र छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीने आक्षेप नोंदविण्यासाठी शहरात मोहीम राबविणे सुरू केले आहे . २० तारखे नंतर आक्षेप नोंद झाल्यानंतर ही समिती न्यायालयातही रिट दाखल करणार असल्याचे या समितीचे अध्यक्ष भैय्या पवार ,उपाध्यक्ष रमेश चव्हाण ,सचिव राहुल मोहितवार यांनी सांगितले आहे . आक्षेपानंतर समीती ही न्यायालयात रीट दाखल केल्यानंतरही हा पेट्रोल पंप इथून हटविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती ही उपोषणालाही बसणार

चौकट :
श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समीती ही जिल्हाधिकारी यांनी सदर पेट्रोल पंपावर दिलेल्या जागा संदर्भात व नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्या संदर्भातलेल्या अटी पुर्ण होतात कि नाही याची प्रत्यक्ष मोक्का पाहणी करून तसा अहवाल घेवुन जिल्हाधिकारी यांना सोपविणार आहे .
रमेश चव्हाण
उपाध्यक्ष / श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती

चौकट :
या वादग्रस्त पेट्रोल पंपाला इथेच ठेवण्यासाठी काही राजकीय मंडळी सरसावली असून त्यांनी नागरिकांच्या समस्येची जाण ठेवावयास हवी . एकतर हा पेट्रोलपंप वर्दळीच्या चौकात आहे दुसरी बाब शेजारीच महाराजांचा पुतळा आहे तर बाजूलाच शहरातील सर्वात मोठे हनुमान मंदीर असल्याने पोळा सण इथेच साजरा होतो या व्यतीरीक्त शहरात होणाऱ्या प्रत्येक विवाह समारंभातील नवरदेवाची वरात इथेच येत असल्याने मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होते . त्यामुळे ९५ वर्षापासूनचे इथे असलेले हे पेट्रोल पंप इथून आज इतरत्र जाणे शहरवासीयांच्या हिताचे राहणार आहे .
अभय पवार
अध्यक्ष / श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा कृती समीती उमरखेड .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!