श्री परशुराम संस्कार सेवा संघाच्या वतीने भव्य गौरव सोहळा संपन्न गुणवंत विद्यार्थांचा सम्मान

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : – श्री परशुराम संस्कार सेवा संघ, शाखा उमरखेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन स्थानिक राममंदिर सभागृहात करण्यात आले. बारावी व दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुछ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दै. पब्लिक पोस्ट उमरखेड
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास साकळे, सुभाष देशमुख, वसंत पांडे, ऍड. रविकिरण देव, पत्रकार विजय आडे, सुरज शुक्ला व पत्रकार स्वप्नील मगरे हे मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील शिक्षणासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात भारत कुलकर्णी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावाचे आणि समाजाचे नाव उज्वल करावे.” तसेच परशुराम सेवा संघाने पुढील उपक्रमाची घोषणा करत सांगितले की, “या वर्षीपासून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कान्नव यांनी केले. संचालनाची जबाबदारी प्रशांत आयाचित यांनी शेरो शायरी म्हणत लीलया पार पाडली. आभार प्रदर्शन मधुसूदन पांडे यांनी केले.
समाजातर्फे घेण्यात आलेल्या सत्कारामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. असे मत कु. मैत्रीयी संस्थानिक या विद्यार्थिनीने व्यक्त केले.
कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांचे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, संघाचे अध्यक्ष संतोष देव, पदाधिकारी सुनील वान्नरे , सुधीर पोटे राजाभाऊ चुरमुरकर श्रीपाद देव, सुनील देशपांडे, चंद्रकांत भानेगावकर, विजय पाध्ये, माधव देशमुख,व ब्रम्हवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.