सामाजिक

महागाव पत्रकार महासंघाकडून निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

यवतमाळ (संज्ञान दृष्टी)। यवतमाळ महागाव पुरोगामी विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे शुक्रवारी पुण्यात “निर्भय बनो “या कार्यक्रमाला जाताना निखिल वागळे यांच्या वाहनावर कधीत भाजपा कार्यकर्तृ यांनी भ्याड हल्ला चढविला, यावेळी वागळे यांच्या वाहनाची तोडफोड | करण्यात आली पोलीस मात्र बध्याच्या भूमिकेत असुर आनंद घेत होते लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभा ची होत असलेल्या कुचंबना, मुस्कट दाबी च्या विरोधात महाराष्ट्र राज्यावे मुख्यमंत्री यांना महागाव तहसील दारा मार्फत आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले निखिल वागळे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी विचारावर व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर करण्यात आलेला हल्ला आहे. देशात प्रतिगामी व कहरवादी विवारसरणी जोर धरत असून संविध् ॥निक मूल्यांना पूर्व नियोजित पायदळी तुडविण्यात येत आहे. वागळे यांच्यावरील हल्ला हा लोकशाही मूल्यांवरील हल्ला असून या घटनेचा महागाव पत्रकार महासंघाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. संपूर्ण घटनेवी निपक्ष चौकशी करून हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी गजानन वाघमारे, गणेश भोयर, विश्वनाथ महामुने, माणिक मुनेश्वर, रियाज पारेख, अशोक राऊत, हर्षवर्धन मुनेश्वर, निलेश पाटील, सय्यद मुदसीर, संजय कोपरकर, ओम देशमुख आणि पवन रावते आदी पत्रकार बांधव निवेदन देताना उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!