शहर

उर्दू बोर्डसाठी शेख अफरोज सरसावले! रेल्वे प्रशासनाला नमवून कायदेशीर पुराव्यांसह ठणकावले; लवकरच होणार ऐतिहासिक निर्णय?


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी, शेख खय्यूम ):
नांदेड रेल्वे स्टेशनवर उर्दू भाषेचा हक्क मिळवून देण्यासाठी शेख अफरोज यांनी सुरू केलेल्या धगधगत्या लढ्याला आता मोठे यश मिळताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन महिना उलटताच, DRM नांदेड यांनी थेट दखल घेत शेख अफरोज यांना पाचारण केले होते. त्यावरून त्यांनी थेट DCM नांदेड यांचे कार्यालय गाठून ऐतिहासिक पुराव्यांसह जोरदार युक्तिवाद केला!
​शेख अफरोज यांनी केवळ चर्चा केली नाही, तर रेल्वे बोर्डाचे ‘वर्क मॅन्युअल बुक’, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क प्रशासनाच्या टेबलवर ठेवून अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. “उर्दू हा कुठल्या एका धर्माचा नव्हे, तर या देशाच्या संस्कृतीचा आणि तहजीबचा श्वास आहे,” असे ठणकावून सांगत त्यांनी, “योग्य निर्णय न झाल्यास थेट न्यायालयात खेचू”, असा थेट इशारा प्रशासनाला दिला. शेख अफरोज यांच्या या आक्रमक आणि कायदेशीर पवित्र्यामुळे DCM कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी पुरते चक्रावले. शेवटी नमते घेत त्यांनी संस्कृती आणि भाषा जपण्याचे लेखी आश्वासन देत सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे.
​आता संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष याकडे लागले असून, शेख अफरोज यांच्या या ऐतिहासिक आणि वादळी लढ्याला अंतिम यश कधी मिळते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button