Uncategorized

जानेवारी ते जूनपर्यंतचे कमिशन थकीत; रास्तभाव धान्य दुकानदारांची तहसीलदारांकडे मागणी


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुका रास्तभाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवाना वेल्फेअर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तहसीलदार महागाव यांना निवेदन देऊन जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील थकीत कमिशन तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संस्थेच्या निवेदनानुसार, तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांना मागील सहा महिन्यांपासून कमिशन मिळाले नसल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच गोदामातून मिळणाऱ्या धान्याचे वेळेवर वितरण व्हावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात धान्य वाहतुकीदरम्यान वजन काट्याद्वारे प्रत्येक कट्ट्याचे अचूक मोजमाप करण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. काही वेळा धान्याचे प्रमाण कमी मिळत असल्याने दुकानदारांना लाभार्थ्यांसमोर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे वितरण प्रक्रिया विस्कळीत होत असल्याने संबंधित समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. सध्या मिळणारे कमिशन अत्यल्प असून त्यात वाढ करून प्रति क्विंटल ३ रुपये अतिरिक्त कमिशन मंजूर करावे, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले असून, मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रास्तभाव धान्य दुकानदारांनी भगवानराव राऊत ,सुभाष कोसलगे, लेवाळकर जाधव, कोरडे, वानखडे, मिराशे भारती व इतर दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button