अवैध धंद्यांना मोकळे रान !देवसरी यात्रेत रम रमा रमी चा धुडगुस : दहा तमाशे, जुगार अड्डयासह दारूचा महापूर

मुख्य संपादक उमरखेड
देवसरी गावात ग्रामदेवतेच्या नावावर भरणाऱ्या यात्रेतस्थानिक ग्रामपंचायतच्या परवानगी विना उमरखेड ठाणेदार व बीट जमादाराच्या आशीर्वादाने दहा तमाशे फड त्यामध्ये अल्पवयीन मुलींचा ही समावेश, जुगार अड्ड्यासह दारूचा महापूर सुरू आहे .त्यामुळे गावातील शांतता भंग होत आहे. बदली होऊनही केवळ अवैध धंदे चालविण्यासाठी आकाच्या आशीर्वादाने चातारी बीटमध्ये डेरा ठोकलेल्या बीट जमादाराने देवसरी गावात अवैध धंद्यांना चालना दिली आहे.
मागील महिन्यात गावात दारू विक्री करणाऱ्यासह व सरपंच पोलीस पाटील यांचा मर्डर करू असे गावात भीतीपत्रक लावल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी संशयित म्हणून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. अवैध धंद्यांनी उच्छाद मांडल्यामुळे गावात भित्तीपत्रके चिकटून टोकाची भूमिका घेतल्याच्या संशयाने तिघांना अटक झाल्यामुळे आता अवैध धंद्याबद्दल ब्र शब्द काढायला कोणीही धजावत नाही त्यामुळे अवैध धंद्यांना रान मोकळे झाले.

चौकट
परवानगी न घेताच तमाशा फड सध्या देवसर येथे ग्रामदेवतेच्या नावावर यात्रा सुरू आहे. या यात्रेत ग्रामपंचायत ची परवानगी न घेता गावात 10 तमाशा फड, यासह जुगार अड्डे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे युवावर्ग वाईट वळणावर चालला असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित उमरखेडचे ठाणेदार व बीट जमादाराची हकालपट्टी करून अवैध धंदे बंद करावे.
सौ मिनाक्षी चंद्रमणी सावतकर, सरपंच देवसरी
चातारी बीटमध्ये अवैध धंद्याचा धुमाकूळ
आकाच्या भरोशावर आकामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धासंबंधित ठाणेदार व जमादाराच्या मनमानीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे हरदळा व चातारी बीटमध्ये अवैध धंद्यांचा धुमाकूळ घालून गलेलठ्ठ कमाई

करणाऱ्या ठाणेदार व बीट जमादारामुळे हरदळा व चातारी बीटसह देवसरी गावात अवैध धंद्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. देवसरी गावातील अवैध धंदे बंद करावे अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.