उमरखेड शहरातील दलित वस्तीमध्ये येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले

सिद्धार्थ दिवेकर उमरखेड शहर प्रतिनिधी
उमरखेड (दिनांक १८ एप्रिल) शहरातील दलित वस्तीमध्ये येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मध्ये मागील चार ते पाच दिवसापासून नाली साफसफाई करण्याकरिता नगरपरिषद उमरखेडचे कोणतेही कर्मचारी अथवा रोज मजूर आलेली नाहीत.
शहरातील मागासवर्गीय वस्ती असल्यामुळे नगरपरिषद जाणून-बुजून या वस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे असे नागरिकांनी यावेळी सांगितले.
पण नगरपालिकेने कर पावती मध्ये “उपयोगिता” कर सर्वात जास्त नागरिकांवर लादण्यात आला आहे आणि सुविधा फक्त झिरो प्रमाणात दिल्या जात आहेत.

तसेच वार्डामध्ये कचरा गाडी, घंटागाडी, सम्यक बुद्ध परिसर झाडण्याकरिता महिला साफसफाई कर्मचारी कधीच येत नाहीत. काल परवाच भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली.
पण त्या दिवशी पण कोणत्याही प्रकारची साफसफाई करिता नगरपालिका प्रशासनाने कर्मचारी अथवा महिला साफसफाई करिता पाठवण्यात आले नाहीत. तसेच डॉ.आंबेडकर वार्ड करिता नियमित नगर परिषदेने कर्मचारी दोन वर्षापासून दिलेला नाही.
चौकट:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड हा मागासवर्गीय वस्तीमध्ये येतो पण नगरपरिषद ने जाणून बुजून वारंवार डॉ.आंबेडकर वार्डाला सुविधेपासून वंचित ठेवले आहे. आणि नगरपालिकेने स्वच्छता मोहीम ही फक्त नावापुरती ठेवलेली आहे…! हीच परिस्थिती उमरखेड शहराची झाली आहे. आणि नगर परिषदेमध्ये प्रशासक अधिकारी असल्यामुळे कोणतीही कामे वेळेत होताना दिसून येत नाहीत पण कर वसुली सक्तीने केली जात आहे – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डामध्ये अनेक दिवसापासून नाल्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही असे तक्रार वारंवार दिली असूनही आता अद्यापही कोणतीही कारवाई आजपर्यंत केली जात नाही.
त्यामुळे वार्डातील छोट्या नाल्या लवकरच घाणीने तुडुंब भरत असून त्वरित नाल्यांची दुरुस्ती करून सांडपाणी जाण्याकरिता नाऱ्याची दुरुस्ती करावी. अशी संताप जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील रहिवासी यांनी दिलीआहे.
चौकट:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डाची सुविधा वेळेवर न मिळाल्यास जनआंदोलन उभारल्या शिवाय पर्याय नाही – प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी उमरखेड)