महामानव डॉ . बाबा साहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी शिवसेनेचा पुढाकार

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड शहरात उत्साहात श्रीराम नवमीची शोभायात्रा काढण्यात आल्यामुळे या कार्यक्रमात श्रीराम जन्मोत्सव समिती व सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितींच्या तसेच शिव प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचा शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला
महामानव डॉ . बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे जेष्ठ नेते रविकांत रुडे होते तर सेवानिवृत मुख्याध्यापक शालिकराव हेडाऊ व सुनिलभाऊ शहाणे हे प्रामुख्याने उपस्थित होते
शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव यांच्या निवासस्थानी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात उमरखेड शिवसेना शहर प्रमुख ॲड . संजिवकुमार जाधव , महिला शहर अध्यक्षा सपनाताई चौधरी , शहर संघटिका संगिताताई धाबे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक शालीकराव हेडाऊ , अनुसुचित जाती सेलचे तालुका प्रमुख ॲड . अजय पाईकराव , सुनिल शहाणे यांनी मनोगत व्यक्त केले
श्रीराम नवमीची शोभा यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात मोलाची कामगिरी बजावण्याऱ्या श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री उल्लंगवार , सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष महेश आलट तथा पदाधिकारी सिद्धार्थ जगताप तसेच शिव प्रतिष्ठानचे विनायक डांगे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मा .उपजिल्हा प्रमुख कैलास कदम , गणेशराव चंद्रवंशी , उपशहर प्रमुख दामोधर इंगोले व विष्णु मते , अर्जुन बरडे , डॉ . प्रदिप इंगोले ,वसंता देशमुख, संदिप चंद्रवंशी , सुरज ठाकरे , प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड , महिला उपशहर प्रमुख सारिकाताई कोकांडे , ज्योतीताई पाईकराव , मंजुषाताई नरवाडे , शारदाताई जाधव , शारदाताई खंदारे इत्यादी शिवसैनिक हजर होते