नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या शाही इफ्तारमध्ये राजकीय दिग्गजांची मांदियाळी!

हिमायतनगर (प्रतिनिधी: शेख खय्युम):
हिमायतनगर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या वतीने मदिना मशिदीत आयोजित ‘शाही इफ्तार’ सोहळ्याने शहरात हिंदू-मुस्लिम एकतेचा एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. या भव्य कार्यक्रमात राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी एकाच पंगतीत बसून बंधुभावाचा संदेश दिला.
या प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विशेष उपस्थिती लावून हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील सर्व नागरिकांना पवित्र रमजान आणि आगामी ईद-उल-फितरच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील, डी.वाय.एस.पी. साहेब आणि पोलीस निरीक्षक अमोल भगत साहेब यांची प्रमुख
उपस्थिती होती. फेरोज खान समद खान कलीम भाई अब्दुल अखिल अब्दुल बाकी तसेच पत्रकार मुजम्मिल, असद मौलाना, मन्नान भाई, अनिल मादसवार, गणेश शिंदे
हनिफ सर, अशरफ खान, अनवर खान सैयद सादिक चतरकर जाहिर मिर्जा आणि शहरातील १७ नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गफार भाई कार्लेकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केले.



