Uncategorized

कर्तव्यनिष्ठ पुरस्कार व षष्ठयब्दीपूर्ती सोहळा संपन्न .॥ दोन आमदारांच्या उपस्थीतीत कर्तव्यनिष्ठ पुरस्कार सोहळा संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड , = तालुक्यातील विवीध क्षेत्रात सामाजीक कार्य करणाऱ्या मान्यवराना यमुना ज्ञान विज्ञान सांस्कृतीक पीठ यमुना नगर उमरखेड द्वारा दिल्या जानारा कर्तव्यनीष्ठ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येउन गौरविण्यात येते यंदाचा हा पुरस्कार सेवानिवृत प्रकल्प संचालक ( डी आर डी ए ) यवतमाळ संभाजी गुणाजी राणे तसेच मरसुळ तालुका उमरखेड येथील सेवानिवृत पोलीस पाटील सखाराम राघोजी मरडकर व पोफाळी तालुका उमरखेड येथील माजी सरपंच आनंदराव सटवाजी बरडे याना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार रवीवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी उमरखेडचे आमदार मा. किसनरावजी वानखेडे आणि हदगाव विधानसभेचे आमदार मा. बाबुरावजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न झाला याप्रसंगी सौ रंजना विठ्ठलराव कदम यांचा षष्टयब्दीपूर्ती सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला . याप्रसंगी ‘ जननी ‘ ह्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले .
यमुना ज्ञान विज्ञान संस्कृती पीठ, यमुना नगर उमरखेड यांच्या वतीने हा पुरस्कार दिल्या जातो.


या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून सौभाग्यवती रंजना विठ्ठलराव कदम या गृहिणीचा त्यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा षष्ठयब्दीपूर्ती सोहळा याच मंचावर संपन्न झाला . कार्यक्रमासाठी परिसरातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती . समाजात सत्कार्य करणाऱ्या मंडळींच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असावेत असा उल्लेख मा. आमदार किसनराव वानखेडे यांनी केला . राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माजी सरपंचाची या पुरस्कारासाठी निवड झाली यांचा आनंद वाटतो असे भावपूर्ण उदगार हदगावचे आमदार बाबुरावजी कदम यांनी प्रकट केले .
सामाजीक क्षेत्रातील ज्येष्ठ असलेले डॉक्टर वाय . एम . राऊत यांचे अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा संपन्न झालेल्या या सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्यात मा . ॲड . माधवरावजी माने , कृषीशास्त्रज्ञ विजयरावजी माने , सौ सरोज मांडवगडे, सौ कल्याणी कदम व सौ वसुंधरा शिंदे आणि पुरस्कार प्राप्त मंडळींच्या वतीने मा . श्री संभाजीराव राणे सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी यवतमाळ यांनी विचार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ . वि . ना . कदम व संचलन श्री सुनील वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ . विरेंद्र विठ्ठलराव कदम यांनी केले . कार्यक्रमास परिसरातील महिला आणि पुरुष मंडळींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!