Uncategorized

आमदार वानखेडे यांना पद व गोपनियतेच्या शपथेची समज द्या शिवसेनेचे महामहिम राज्यपालांना साकडे

       

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

          उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार किसनराव वानखेडे हे त्यांच्याकडे आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी  येणाऱ्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या स्वतः सोडविण्याऐवजी भाजपा नेत्यांकडे जाण्यास सांगतात त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो . नागरिकांची गोपनिय  माहिती पक्षाच्या नेत्यांकडे उघड करण्याचे काम सातत्याने करीत असल्याने आमदार किसनराव वानखेडे यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना (शिंदे ) पक्षाच्यावतीने राज्याचे महामहीम राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे .
    अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 82 उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किसनराव वानखेडे यांना मतदारसंघातील मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी करून आमदारकी बहाल केली .
     जनतेचे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्याकडे आपल्या वैयक्तिक सार्वजनिक  समस्या घेऊन गावोगावचे लोक 70 ते 80 किलोमीटर प्रवास करून येत आहे .परंतु आमदार महाशय हे त्यांच्या कामाची विचारपूस करण्यापेक्षा त्यांना चला आपण भाऊंना भेटू असे म्हणून भाजपा नेते नितीन भुतडा यांचे घरी घेऊन जातात . सर्वसामान्य नागरिक आपल्या व्यथा आमदारांकडे मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु आमदार महाशय त्यांचे कामाची  इत्यंभूत माहिती नेत्यांकडे सांगतात ,सदर नेत्यांच्या माहिती सार्वजनिक करतात , त्यामुळे गोपनीयता भंग पावते .दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळचे सुमारासशिवसेना पदाधिकारी व शहरातील ज्येष्ठ नागरिकांवर भाजपा नेते नितीन भुतडा  यांनी खालच्या पातळीवर टीका करून आमदार वानखेडे यांचे समक्ष गोपनीय अहवालाच्या झेरॉक्स प्रति वाटल्या त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला .विद्यमान आमदार किसनराव वानखेडे यांना विधानभवनात झालेल्या शपथविधी मध्ये कर्तव्य अधिकार व गोपनीयता यांची शपथ दिल्या गेली .त्या कर्तव्य आणि गोपनीयतेचा त्यांच्याकडून वारंवार भंग होत आहे .भाजपा नेत्यांना न विचारता एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेले असता आमदार महाशयांना तंबी दिली जाते .याचे उदाहरण निवेदनात नमूद करून आमदारांच्या वागणुकीमुळे जनतेने निवडून दिलेल्या मानाच्या पदाची गरिमा लोप पावत आहे त्यामुळे आमदार किसनराव वानखेडे यांना कर्तव्याची अधिकाराची व गोपनीयतेची घेतलेल्या शपथेची महामहिम राज्यपाल यांनी जाणीव करून द्यावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे रविकांत रुडे , शहराध्यक्ष ॲड. संजीवकुमार जाधव,उपशहर प्रमुख र राजु गायकवाड शहर प्रसीद्धी प्रमुख, बसवेश्वर क्षीरसागर,सुभाष बाभुळकर,विभाग प्रमुख रवींद्र कलाने,एड .अजय पाईकराव,साजन रुडे  यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!