शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे ब्युटी पार्लर व्यवसायाचे दहा दिवसाचे प्रशिक्षण संपन्न…

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड या संस्थेत महिलांसाठी ब्युटी पार्लर (कॉस्मेटोलॉजी) व ड्रेस मेकिंग हे दोन स्वतंत्र व्यवसाय कार्यरत आहेत सदर व्यवसायामध्ये दरवर्षी एकूण ४४ महिला प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे संस्थेमध्ये ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेल्या ५० महिला प्रशिक्षणार्थींसाठी लॉरियल ग्रुप व नंदी फाउंडेशन पुणे यांचे मार्फत” ब्युटी फार बेटर लाइफ “हे १० दिवसाचे निशुल्क प्रशिक्षण दिनांक १८ जानेवारी ते २१ जानेवारी व २७ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणासाठी नंदी फाउंडेशन यांचे मार्फत श्री हिमांशु सर व स्नेहा मॅडम या प्रशिक्षित ट्रेनर्स मार्फत संस्थेतील एकूण 50 महिला प्रशिक्षणार्थींना सॉफ्ट स्किल, एम्प्लॉयबिलिटी स्किल तसेच ब्युटी पार्लर व्यवसायाशी संबंधित फेशियल, हेअर कट, मेकअप, तसेच ब्युटी पार्लर क्षेत्रातील विविध स्किल्स,कॉस्मेटिक कंपनीचे विविध ब्युटी प्रॉडक्ट्स व त्याचा वापर या विषयावर सैद्धांतिक,प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थींना एकूण १० दिवसाचे उत्कृष्ट प्रशिक्षण नंदी फाउंडेशन ग्रुप पुणे येथील मास्टर ट्रेनर्स हिमांशू सर व स्नेहा मॅडम यांचे कडून देण्यात आले . सदर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला प्रशिक्षणार्थींना नंदी फाउंडेशन मार्फत कोर्स प्रमाणपत्र व लोरियल कंपनी मार्फत ब्युटी पार्लर किट दिली जाणार आहे सदर प्रशिक्षणाचा समारोप ०१ फेब्रुवारी२०२५ रोजी संस्थेमध्ये करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री डी पी पवार ,गटनदेशक संजय खुटाफळे सर , आनंद कुंभारे , देशमुख सर, नांदी फाउंडेशन पुणे या संस्थेचे मास्टर ट्रेनर हिमांशू सर , स्नेहा मॅडम ,संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच सहभागी महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सदर प्रशिक्षणाचा उपयोग ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी करावा व आत्मनिर्भर होऊन यशस्वी उद्योजक व्हावे व इतरांनाही रोजगार प्रदान करावा ही भावना प्राचार्य श्री डी पी पवार यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये व्यक्त करून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना पुढील करियर साठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करून सदर प्रशिक्षणामुळे झालेल्या फायद्याबाबत मनोगत व्यक्त केले . सदर प्रशिक्षण शिबिर पूर्ण होण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी पथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.