Uncategorized

आयटीआय उमरखेड येथे माजी प्रशिक्षणार्थींचा मेळावा संपन्न—-

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेमधून उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यासाठी मागील पाच वर्षांमध्ये संस्थेमधून विविध व्यवसायामध्ये उत्तीर्ण झालेल्या व शिकवू उमेदवारी रोजगार स्वयंरोजगार व उच्च शिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना निमंत्रित करून सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानुसार मागील पाच वर्षांमध्ये संस्थेतील इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, वेल्डर मोटर मेकॅनिक ,डिझेल मेकॅनिक पत्रेकरागीर ,ड्रेस मेकिंग व ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या झालेले १२० महिला व पुरुष प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेमध्ये विविध व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तसेच शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी योजना प्रशिक्षण,शासकीय नोकरी मिळालेल्या व स्वयंरोजगार करीत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा संस्थेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय प्रशिक्षणाचा शिकाऊ उमेदवारी ,रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी मिळालेला फायदा व आयटीआय बेसवर त्यांना शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये सन्मानाच्या पदावर मिळालेल्या नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधी याबाबत आपले अनुभव कथन करून संस्थेबद्दल ऋण प्रगट केले. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री डी पी पवार यांनी उपस्थित सर्व महिला व पुरुष प्रशिक्षणार्थींना आयटीआय प्रशिक्षणानंतर शासनाचे विविध उपक्रम ,शिकाऊ उमेदवारी योजना रोजगार व स्वयंरोजगारच्या विविध संधी स्वयंरोजगारासाठीच्या शासनाच्या विविध आर्थिक व कर्ज योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिकाऊ उमेदवारी योजना ,रोजगार स्वयंरोजगार, उच्च शिक्षण याचा आढावा घेण्यात आला व भविष्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन व मदत करण्याठी माजी प्रशिक्षणार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर रोजगार व स्वयंरोजगार विषयक सर्व माहिती पाठवने तसेच संस्थेमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन उपस्थित उमेदवारांना देण्यात आले याप्रसंगी आय टीआय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे पालक संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारी व प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे मोटर मेकॅनिक विभागाचे शिल्प निदेशक श्री आनंद कुंभारे सर आभार प्रदर्शन श्री अविनाश देशमुख सर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!