‘त्या’ चालकाची नोंदच नसल्याचे उघडकीस स्कूल बस अपघातप्रकरण शाळेत, चौकशी समिती दाखल, तब्बल दोन तास चौकशी

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
अमरावती येथील शिक्षण उपसंचालक नीलीमा टाके यांच्या आदेशान्वये २५ जानेवारीला घडलेल्या स्कूल बस अपघात प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी समितीने मंगळवारी २८ जानेवारीला शाळेत जावून तब्बल २ तास चौकशी केली. चौकशीत अपघात करणाऱ्या चालकाची शाळेत कुठेच नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दहागाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लीश मीडियमच्या ७ क्रमांकाच्या स्कूल बसचा अपघात पळशी फाट्याजवळ घडला होता. त्यामध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या महिमा सरकटे हिचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री संजय राठोड यांनी या अपघात प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासन कामी लागले. चौकशी समितीचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षणाधिकारी पी. एम. मिश्रा, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, गटशिक्षण अधिकारी सतीष दर्शनवाड हे स्टुडंट वेलफेअर इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मंगळवारी सकाळी ११
वाजता धडकले. यावेळी शाळेवर एकही कर्मचारी हजर नसल्याने त्यांना भ्रमणध्वनीवरुन बोलावले यावेळी चौकशी समितीने शाळेची महत्वाची कागदपत्रे, शाळेच्या परिवहन समितीची चौकशी केली. यामध्ये कागदावरच परिवहन समितीचे कार्य आढळून आले तर शाळेच्या केवळ ४ स्कूल बस असल्याचे दर्शविण्यात आले. त्या ४ स्कुल बसची आरसी बुक, विमा, वाहन फिटनेस प्रमाणपत्र यासह इतर वाहनाची कागदपत्रे आढळून आली नाही. त्याचबरोबर अपघातग्रस्त बसचा चालकासह इतरही चालकांची शाळेच्या दप्तरी कुठेच नोंद नसल्याचा प्रकारही उघडकीस आला. आता यापुढे शाळेवर काय कार्यवाही होते हे अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या अपघातप्रकरणी गुन्हे दाखल झालेले संस्थाचालक दर्शन अग्रवाल व प्राचार्य माधव कदम हे फरार आहेत.
चौकट
शाळेच्या कागदाफ्फत्रामध्ये आढळली बरीच तफावत
स्कूल बस अपघात प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशानुसार चौकशी केली आहे. शाळेच्या नियमावलीनुसार ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत व शाळेच्या कागदापत्रामध्ये बरीच तफावत आढळून आली आहे. पी. एम. मिश्रा, अध्यक्ष, स्कूलबस अपघात चौकशी समिती.