Uncategorized

उमरखेड आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा!

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड : राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन नुकताच साजरा करण्यात आला विभाग नियंत्रक अमोल गोजारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके, जे.डी.मनवर सहाय्यक अधीक्षक प्रकाश भदाडे कार्यशाळा सहाय्यक अधीक्षक आदी उपस्थित होते कार्यक्रमालाच्या सुरुवातीला प्रवासी राजा दिनात प्रवासी व प्रवासी संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या एकूण सात निवेदनांच्या तक्रारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली या सात तक्रारदारांमध्ये साहेबराव धात्रक, आशिष राठोड ,राहुल मोहितवार, गणेश वानखेडे, मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड, शेख इरफान, हिरासिंग चव्हाण, रमेश वानखेडे आदींनी मानव विकास बस व नवीन बस फेऱ्या बाबत आपापली निवेदने प्रवासी राजा दिना वेळी सादर केली होती तर कामगार पालक दिन कार्यक्रमांमध्ये एकूण दहा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या सोडविण्याबाबतची निवेदने यावेळी सादर केली या कार्यक्रमाला प्रवासी प्रवासी संघटना व उमरखेड आगारातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उमरखेड आगारात अशा प्रकारच्या आगळ्यावेगळ्या प्रवासी हिताच्या व कामगार हिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे प्रवासी वर्गातून व उमरखेड आगारातील कर्मचारी वर्गातून या बाबीचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!