सामाजिक

हल्लेखोरावर कायदेशीर कार्यवाही करू असे लेखी पत्रासह प्रस्ताव घेऊन आलेल्या


गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे व ठाणेदार संजय सोळंके यांचे उपस्थितीत शेख इरफान यांनी केली उपोषणाची सांगता


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

संपादक शेख इरफान आमरण उपोषण तसेच संयुक्त पत्रकार संघ उमरखेड यांनी तहसील कार्यालयाचे प्रांगणात येथे साखळी उपोषण सुरू केले होते. मंगळवार दि.१६/०७/२०२४ सातव्या दिवशी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन पत्र दिलं आहे त्यात संपादक शेख इरफान यांच्यावर खुनशी हल्ला करणाऱ्या आरोपीवर एम पी डी ए व पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कार्यवाही मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी भ्रमणध्वनी वरून आदेश दिल्याने पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कलम (४) वाढविण्यात आले आहे सदर आरोपीवर कलम ११०,व १०७,११६,३ जा फौ प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आरोपीवर याअगोदर पोलीस स्टेशनला किती गुन्हे दाखल आहेत,याबाबत अभिलेख तपासणी करून योग्य ती प्रतिबंधक कारवाही करण्यात येते तसेच सदर गुन्ह्यात इतर चिथावणी देणाऱ्या शाहरुख पठाण व जलील कुरेशी यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल उमरखेडचे ठाणेदार संजय सोळुंके पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे व पोलीस प्रशासनाने असा शब्द उपोषणकर्त्यांना लेखी पत्रा द्वारे दिला शिवाय उपोषणकर्त्यांना आश्वासन देऊन सदर उपोषण सोडविण्या संदर्भातील प्रस्ताव घेऊन
पोहोचले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर १० जुलैपासून सुरू करण्यात आलेले उपोषण ठाणेदार संजय सोळंके यांचे हस्ते सरबत घेऊन मागे घेण्यात आले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे, संतोष राठोड,विलास चव्हाण (संपादक जय राजसिंहासन) सरोजताई देशमुख नंदकुमार देशमुख प्रवीण सुर्यवंशी सर, रितेश पाटील कदम, सुनील लोखंडे सर,सुरेंद्रनाथ दळवी,अवधूत खडककर, स्वप्निल मगरे, ज्ञानेश्वर लोखंडे, गजानन वानखेडे , सुनील शहाणे शेख मुजाहिद शेख इसा हे यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!