Uncategorized

उमरखेड शहरात सर्व नियम धाब्यावर बसवत नागचौकातील ब्लु डायमंड बार अॅन्ड रेस्टॉरंट सकाळी 6 वा. पासून उघडे

कर्तव्यदक्ष उ.पो.अ. हनुमंत गायकवाड व पो.नि. शंकर पांचाळ यांनी सदर बारवर कारवाई करावी

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

उमरखेड-उमरखेड शहरातील नागचौक येथील ब्लु डायमंड बार अॅन्ड रेस्टॉरंट हे गड्डमवार यांच्या मालकीचे असुन सदर बार हा मागील सहा वर्षापासून अमोल नंदनवार यांनी भाडेतत्वावर घेतला आहे. या बारला उत्पादन शुल्क यवतमाळ व पोलीस विभागाचे कोणतेही नियम नाहीत का ? कारण उत्पादन शुल्क विभाग हा महिनेवारी चिरिमीरी घेऊन हात वर करत आहे. मांजर जसे डोळे लावत दुध पिते तसाच उत्पादन शुल्कचा कारभार आहे.

ब्लु डायमंड बार हा सकाळी 6 वा. चालू होतो व रात्री एक वाजता बंद होतो. उमरखेडमध्ये रात्रीला जे वादविवाद होतात, त्या गोष्टीला हाच बार जबाबदार आहे. या बारचे भाडोत्री हे मद्य पित असलेल्या ग्राहकांच्या नशेचा फायदा घेत बिलात अफरातफर करत ग्राहकासोबत अरेरावी करतात. यामध्ये अमोल नंदनवारचा लहान भाऊ आशिष नंदनवार हा अतिशय चालबाज व्यक्ती असुन हा याच बारमध्ये रोजंदारीने आहे. परंतू ग्राहकांच्या बिलात हेराफेरी व दारु मद्य कमी देत, दररोज दोन हजार रुपये खिशात नेतो. अमोल नंदनवारने बार भाडोत्री घेतला व आपलाच भाऊ दारु मालात गरबड न करता ? ग्राहकांना लुटतो? म्हणून अमोलला काहीच दुःख नाही व ग्राहकांचे खिसे खाली होत आहेत ? याची कल्पना असुन सुद्धा हा ढोंगी वृत्ती वापरतो.

उ.पो.अ. हनुमंत गायकवाड साहेब व ठाणेदार शंकर पांचाळ साहेबांनी ब्लु डायमंड बारवर नियमभंगाची कारवाई करावी व जिल्हाधीकारी व उत्पादन शुल्क विभागाला या बारचा परवाना जप्त करण्यासाठी तक्रार पाठवावी. अशी जनतेची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!