पिंपळदरी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
आदिवासी समाजाच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि ब्रिटिशांविरोधात उलगुलान आंदोलन उभारणारे क्रांतीकारक, लोकनायक शहीद बिरसा मुंडा यांची जयंती 30 नोव्हेंबर रोजी आदर्श गाव पिंपळदरी येथे साजरी करण्यात आली,यावेळी उपस्थित चरण डोंगरे,मनीषा कऱ्हाळे,सरपंच बंडू ढाकरे सुरेश तांबरे,डॉ,कदम यांनी आपले विचार व्यक्त करताना बिरसा मुंडा यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला,आदिवासी समाज आज सुद्धा हलाखीच्या परिस्थिती मध्ये राहत आहे,आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावन्यासाठी सरकार कोणत्याही ठोस योजना राबवित नाही,शेळ्या,मेंढ्यांच्या योजना देऊन आदिवासी समाजाला पुनः जंगलात पाठविण्याचा प्रयत्न करत
आहे,आदिवासी समाजाने एकसंघ राहून आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठं करावं असं आवाहन चरण डोंगरे यांनी केले,या कार्यक्रमाला पिंपळदरी गावचे सरपंच बंडू ढाकरे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबूराव आमटे,शाळा समिती अध्यक्ष शंकर मासोळकर, मारोती कऱ्हाळे, अमोल नाईक,दत्ता माहूरे,गौतम कांबळे,सुरेश तांबारे,उत्तम माहूरे,गणेश गुहाडे, गुलाब मिरासे, मारोती नाईक,देवबा कुरोडे,बालाजी कबले, सुभाष ढाले,खंडू बंदुके,पोलीस पाटील रंजना रिठे,अनुसया नाईक,मा.पंचायत समिती सदस्य मनीषा कऱ्हाळे, ग्रा, पं, सदस्य यमुना रिठे यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकरी महिला, पुरुष उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश ढाले यांनी केले,तर आभार अविनाश रिठे याने मानले हा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी जय बिरसा मित्र मंडळ पिंपळदरीच्या सर्व तरुणांनी सहकार्य केले,