Uncategorized

आ.किसनराव वानखेडे यांचे अध्यक्षतेत पाणीटंचाई आढावा बैठक संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड पाणीटंचाई सदृश गावात विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहित करून संबंधित गावात तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच
अधिग्रहणाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात याव्यात आशा सुचना आमदार किसनराव वानखेडे यांनी दिल्या ते दि.8 मे रोजी स्थानिक जिजाऊ भवन येथे आयोजित ‘पाणीटंचाई आढावा’ बैठकीमध्ये अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे, भाजपा यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर, गटविकास अधिकारी किरण कोळपे,स.गटविकास अधिकारी पंजाब रणमले, अभियंता सौरभ सोनी आदीजन प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पाणीटंचाई सारख्या संवेदनशील बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्येवाही करण्यात यावी अशी सूचना यावेळी भाजपा यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी प्रशासनास केली.
पाणीटंचाई सदृश गावातील सरपंच व ग्रामसेवकांच्या अनुक्रमे समस्या ऐकून त्या उपविभागीय अधिकारी,गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना तातडीने सोडविण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या गेल्या.
सण 2024 साली अधिग्रहित केलेल्या विहिरी, बोअरवेल व टँकर मालकांचे अधिग्रहणाचा मोबदला देखील तातडीने अदा करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
पाणीटंचाई सदृश गावात महावितरण विभागास स्थानिक विकास निधी मधून अतिरिक्त रोहित्र प्रदान करण्याच्या सूचना देखील यावेळी नितीन भुतडा यांनी केल्या.
यावेळी उमरखेड तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

बॉक्स–पाणीटंचाई निवारणात कामचुकार पणा, आढावा बैठकीस गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्येवाही करण्याचे आदेश आ.किसनराव वानखेडे यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!