खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मुडाणा येथे भेट, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी वेळ नाही

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आज दिनांक ३० / ९ / २०२५ रोजी खासदार नागेश पाटील आष्टीकर मुडाणा ता. महागाव येथे अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची तसेच पिकांचे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्या करिता मुडाणा येथे आले होते . या वेळी शेतकऱ्यांना त्यांनी मोठा दिलासा देत शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असे सांगितले परंतु महागाव तालुक्यात दहिसावळी एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 21 तारखेला व 24 तारखेला परंतु या गावात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटी देण्यास टाळले मुडाना परिसरात आपली उपस्थिती दाखवून दौरा गुंडाळण्यात आला या वेळी मंडळाधिकारी राम पंडित , शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी शाखा भरवाडे, विशाल पांडे , भिमराव भालेराव, तालुका प्रमुख रविंद्र भारती,उपतालुका प्रमुख नानाभाऊ पानपट्टे, सरपंच वैभव बरडे, उपसरपंच अशोक वानखेडे,माजी उपसरपंच रमेश जाधव, गजानन पाटील,अतुल येनकर, दत्ता दांडेगांवकर, गोलू पठाण, शरद गोभे, राहुल वानखेडे, रवि जाधव, जितू चव्हाण तसेच तलठी बोक्षे मॅडम हजर होत्या . त्यामुळे तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे



