Uncategorized

माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी दाखल केला नामांकन अर्ज;

उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, दि. २८: उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. या महत्वपूर्ण क्षणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिति लावून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.नजरधने यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत उमरखेड-महागाव मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारसंघातील बेरोजगारी, शिक्षण, शेती आणि रस्ते विकास या प्रश्नांना केंद्रबिंदू मानून आपली सेवा समर्पित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मनसेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या नेत्याला मोठ्या उत्साहाने पाठिंबा दिला. रस्त्यावर ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जोश, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोष यांनी संपूर्ण वातावरण उत्साहमय बनवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!