Uncategorized

आम्हाला युद्ध करून विजय नको आहे!आम्हाला संयम वाला साहेब परिवर्तन पाहिजे आहे!

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक १७ सप्टेंबर)
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जात आहे.काँग्रेस पक्षात अनेक उमेदवार विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस पक्षात पहिलेच घराणेशाही चालते म्हणून भारतीय जनता पार्टीचे आरोप असते की,काँग्रेस पक्षात तिकीट एकाच घरात दिले जाते एक तर स्वतः किंवा घरात बायको नाही तर लेकरानां! या पक्षात नवीन कार्यकर्ते यांना अवसर कधीच भेटत नाही.काँग्रेस पक्षात एकदा आमदार, खासदार झालेल्या उमेदवाराला एक वेळेस नाही तर दोन दोन वेळेस तिकीट दिल्या जाते. तिकीट देऊन ही ते निवडून येत नाही तरी पण पक्ष वरिष्ठ आपल्यावर लागणाऱ्या आरोपाप्रमाणे तिकीट एकाच घरात देण्याची परंपरा चालू ठेवत असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस पक्षाला आपले उमेदवार जिंकवून आणायचे असेल तर नवीन चेहेरा असलेल्या आणि समाजसेवाची आग आपल्या काळजात घेऊन फिरत असलेल्या उमेदवारी द्यावी अशी भावना उमरखेड विधानसभेतील जनता व्यक्त करत आहे.

उमरखेड विधानसभा मध्ये आज समाजसेवा करणारे हजारो चेहेरे असून सुद्धा दिग्गज कार्यकर्ते नवीन चेहेरेला डावलून तिकीट आपल्यालाच मिळावं म्हणून आटापिटा करत असल्याचे दिसत आहे. पण उमरखेड विधानसभा मधील जनते ने आपल्याला जुने जुने चेहरा असलेले नेते पाहिजे नसून जे नवीन चेहरा आलेला त्यालाच पसंदी देऊ म्हणत आहे . जनता ने अनुभवले आहे की जुन्या उमेदवाराला तिकीट देऊन ही तो विजयी होणार नसून त्यांना पक्षाने तिकीट देऊ नये,जे नवीन आहे त्याने उमरखेड विधानसभा पिंजून काडून लोंकाची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्याचे काम केले आहे अशाच उमेदवाराला विधानसभा तिकीट द्यावे.

उमरखेड विधानसभाच्या जनतेच्या मुखातून सध्या साहेबराव कांबळे हाच एकमेव आणि सच्चा समाजसेवक असून त्यांनी विधानसभामधील गावात गावात जाऊन लोकांशी चर्चा करत असून तेथील लोंकांचे व्यथा जाणून घेत आहे. अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा हात दिला आहे.
म्हणूनच उमरखेड विधानसभाची जनता म्हणतांना दिसत आहे की, आम्हाला “युद्ध करून विजय नको आहे आम्हाला संयम वाला साहेब परिवर्तन पाहिजे”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!