Uncategorizedसामाजिक

महागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड अध्यक्षपदी संजय कोपरकर,

उपाध्यक्षपदी सदानंद जाधव तर सचिवपदी रजतकुमार खाडे यांची निवड

शेख मुजाहिद

ससंपादक मो.779830619

महागाव ता.१४ : महागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार संजय कोपरकर, उपाध्यक्षपदी सदानंद जाधव तर सचिवपदी रजतकुमार खाडे यांची निवड दसर्याच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी (ता.१२) रोजी सर्वानुमते करण्यात आली आहे. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर, नवचंडीका देवी संस्थान सवना येथे महागांव तालुका मराठी पत्रकार संघाची नव्यानेच स्थापना करण्यात आली आहे. महागांव तालुका मराठी पञकार संघाच्या पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नत्तीसाठी सदैव कटिबद्ध असलेल्याचे नबनियुक्त अध्यक्ष संजय कोपरकर
यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे मार्गदर्शक निलेश भगवानराव नरवाडे (पाटील) यांनी केले, नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कोपरकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी मराठो पत्रकार संघाचे मार्गदर्शक श्री. निलेश भगवानराव नरवाडे (पाटील), महागांव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य श्री. शिवानंद तुळशिराम राठोड, श्री. श्रीकांत विश्वनाथ राऊत, श्री. संदीप उत्तमराव कदम, श्री. विजय केशवराव देशमुख, ताह मिझां हमिद मिर्झा, सय्यद मुसदिर, श्री. सचिन अमृतराव उचाळे, श्री. मंचकराव शंकरराव गोरे, श्री. नरेंद्र आनंदराव नप्ते सय्यद मुद्दसिर या सर्व पत्रकार बांधवांनी महागांव तालूका मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!