Uncategorized

तीक्ष्ण हत्याराने गळा चीरलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड – पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत येत
असलेल्या चुरमुरा – दगडथर रस्त्यालगतच्या जंगलात एका २३ वर्षीय युवकाचा गळा चीरलेल्या अवस्थेत मृत देह आढळल्याची घटना रवीवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी
उघडकीस आली. चुरमुरा – दगडथर रस्त्यालगत असलेल्या जंगलात चुरमुरा येथील गुराखी गुरे चारीत असताना गुराख्याला
एक मृतदेह आढळून आला या बाबत गुराख्याने चुरमुरा येथील पोलीस पाटील याणा या बाबतीत माहीती दिली मिळालेत्या माहीती वरुण पोलीस पाटील यानी घटनेची माहीती उमरखेड
पोलीसाना दिली. तेव्हा पोलीस कर्मचारी यानी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेउन शवविच्छेदनास आणन्यात
आले. मृतकाच्या खिशात मीळालेल्या कागदपत्रावरून मृतक
सुमीत प्रभाकर सोळंके हा राहणार चरडे नगर येथील रहीवाशी असल्याचे निष्पन झाले. मृतक सुमीत हा एवढ्या लांब अंतरावर का गेला याचे गुढ अद्यापही कायम असुन मृतकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले असुन. घटनेचा
पुढील अधिक तपासउमरखेड पोलीस करीत असुण या प्रकरनाने
उमरखेड शहरात एकचखळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!