आदिवासी भिल्ल नाईकडा समाजाचा नायक परशरामजी पिलवंड यांचा १८ व्या स्मृतिदिनी साजरा


शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड :- तालुक्यातील जेवली येथे आज दिनांक२२ नोव्हेंबर रोजी परसरामजी पिलवंड यांचा १८ व्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परशराम पिलवंड यांचा जन्म जेवली या गावात १९३१ साली झाला. यांनी पहिल्या वर्गापासून परिस्थितीमुळे शिक्षकाला अखेरचा सलाम ठोकला आपल्या समाजाच्या माथी

लागलेल्या दारिद्र्याचा कलंक पुसण्यासाठी त्यांनी खुप संघर्ष केला. अज्ञान व अंधश्रद्धेच्या विळख्यातून माझा समाज मुक्त व्हावा म्हणून त्यांनी सतत प्रबोधनाचे कार्य केले. स्वतःच्या तुटपुंज्या संसारातून जे देता येईल ते त्यांनी समाजास दिले. भूमिहीनांना व मुळ निवासी हक्कदारांना हक्काची जमिन मिळवून देण्यासाठी १९७१ साली पेंदा ता. उमरखेड येथे १८३ सहकाऱ्यांना घेऊन सत्याग्रह केला. शिक्षणाचे महत्त्व जाणून सर्वांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. हा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून समाजातील सर्व स्तरापर्यंत पोचविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचे विचार ते गावा-गावात पोहोचवित स्वतः अशिक्षित असताना स्वाभिमानाने जगण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला. आयुष्यभर समाजासाठी संघर्ष करणाऱ्या या नायकाने वयाच्या ७६ व्या वर्षी म्हणजे २२ नोव्हेंबर २००५ रोजी जेवली येथे शेवटचा श्वास घेतला. अशा या भिल्ल नाईकड़ा आदिवासी नायकास स्मृतिदिनी आदिवासी कृती समिती उमरखेड च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
