Uncategorized

जनतेचा कौल आम्हालाच, बाद झालेल्या डमीने हार राम देवसरकर

( कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडून आलेल्या 7 संचालकांचा सत्कार व जनतेचा आभार कार्यक्रम )

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :एका बाजुला भाजपाची संपूर्ण सत्तेची ताकद , विद्यमान आमदारांसह चार माजी आमदार आणि त्यांचा गोतावळा अन पैशाच्या महापुर असतांना, कॉग्रेस पुरस्कृत शेतकरी सहकारी विकास पॅनलने दिलेली टक्कर वाखण्याजोगी होती. झालेल्या निवडनुकीत जनतेचा कौल आम्हालाच होता, बाद झालेल्या डमीने हार पत्कारावी लागली. अशी स्पष्टोक्ती 9 जुन रोजी दु 2 वाजता स्थानिक भवनामध्ये झालेल्या आभार कार्यक्रमातून राम देवसरकरांनी दिली.

 गत आठवड्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सहकारी पॅनलच्या संचालक व कार्यकर्त्यांनी काट्याची लढत दिली . भाजप पुरस्कृत विरोधी पॅनल कडून  संपूर्ण सत्ता , विद्यमान आमदार, चार माजी आमदार, तथाकथित किंग मेकर आणि त्यांचा सर्व गोतावळा व सोबतच पैशाचा महापूर एवढे सर्व असतानाही, काँग्रेस पुरस्कृत पॅनलने मतदारांच्या भरोशावर काट्याची लढत देत, किल्ला लढवला असल्याने, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे,  राम देवसरकर यांनी बोलून दाखदिले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले होते.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तातु देशमुख , राम देवसरकर , गोपाल अग्रवाल , चितांगाराव कदम, सतिश मुटकुळे , सतिश नाईक, दत्तराव शिंदे, बाळासाहेब चंद्रे , सविताताई कदम, खॉजाभाई कुरेशी, सुधाकर लाहेवार, आत्माराम शिंदे, विठ्ठलराव चव्हाण यांच्यासह काँग्रेस, शिंदे शिवसेना व उभाठा शिवसेना अशा तिन्ही पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन शिवाजी वानखेडेंनी तर आभार प्रेमराव वानखेडे यांनी मानले.

चौकट

सहकार वाल्याच्या कानाखालून गोळी

निवडणुकीवेळी तालुक्यातील 43 सोसायटीवर आपले प्रभुत्व असून 18 सीट आम्ही जिंकून आणणार अशी वल्गना करण्यात आली. त्याच सोसायटी गटातुन आमच्या पॅनलचे 11 पैकी 6 संचालक निवडुण आले, तर तीन उमेदवारांचा विजय अनुक्रमे 2,3, 4 मतांनी हुकला. त्यामुळे सहकार क्षेत्रात प्रभुत्व असल्याचे सांगणाऱ्यांच्याच कानाखालून गोळी गेल्याने, त्यांनी आत्मपरिक्षण करावे. असा निशाणा यावेळी राम देवसरकरांनी , माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांवर लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!