उमरखेड नगर परिषदेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाणून बुजून दुर्लक्ष

(नाम फलक लावण्याची मागणी)
सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक २९ सप्टेंबर) येत्या काही दिवसात धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त उमरखेड शहरातील हजारों च्या संख्येने नागरिक महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येतात. त्या पूर्वीच तेथील पुतळ्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची प्लेट काही कारणास्तव निघून पडली होती ही माहिती संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात आली होती पण मागील सहा महिन्यापासून ती नाम फलक बसविण्यात आले नाही.
मागील १ महिन्या पासून वारंवार सूचना, अर्ज, निवेदने करून सुद्धा नगर परिषद मुख्याधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डातील तरुण तडफदार प्रफुल दिवेकर शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी उमरखेड तसेच पत्रकार सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड यांनी व्यक्त केले.
८ दिवसात नाम फलक न लावल्यास नगर परिषद प्रांगणात उपोषण तसेच तीव्र आंदोलन करू असा नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.