Uncategorized

घरकुल प्रपत्रातील निकषानुसार घरकुल द्या .. संध्या रणवीर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798386192

महागांव/उमरखेड दी २७
उमरखेड महागांव या तालुक्यात घरकुल आवास योजनेत ग्राम स्तरावर घरकुल लाभार्थी निवडीत झालेली अनियमितता झाल्याच्या तक्रारी असून प्रपत्र यादी तात्काळ रद्द करून गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री, व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनातून सौं संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी केली आहे
सविस्तर असे की महागांव उमरखेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, व अन्य रमाई आवास, यशवंतराव चव्हाण, शबरी आवास या घरकुल योजनेची प्रपत्र यादी नुकतीच

ग्रामपंचायत स्तरावर निवड करण्यात आली यात अनियमितता व घरकुलचे निकष धाब्यावर बसवल्या गेले असून पक्के घर असणाऱ्यांचा घरकुल लाभार्थ्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मूळ लाभार्थी डावलल्या गेले आहे.यामुळे त्याच्यावर हा अन्याय असून सदरची पपत्र यादी तात्काळ रद्द करून गोर गरीबांच व खरे लाभार्थी यांचा यात समावेश करावा व घरकुल निधी ३ लक्ष करण्यात यावा अशी मागणी संध्या रणवीर यांनी शासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!