Uncategorized

मुसळधार पावसामुळे पुसद येथील सोना बॅटरीज दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान

जवळपास १५ लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाला असल्याचा अंदाज

पुसद प्रतिनिधी

पुसद शहरासह जिल्ह्यात काल दिनांक १ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून या मुसळधार पावसामुळे पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहम्मदिया मस्जिद जवळील सोना बॅटरीज या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने संबंधित दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाळ्याच्या या पाण्याची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, सदर दुकानात चार ते पाच फूट पाणी साचले होते. त्यामुळे दुकानात विक्रीसाठी असलेले, बॅटरीज,इन्वर्टर, इत्यादी सामान निकामी झाली आहे. सदर प्रकरणी सोना बॅटरीज या दुकानाचे मालक जियाउलहक अब्दुल गणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ५ हजार ते २० रु पर्यंतचे बॅटरीज व इतर उपकरण हे विक्रीसाठी असतात. त्यामुळे त्यांचे जवळपास १५ लाखापेक्षा अधिक रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. मागील दोन दिवसात या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरसह तालुक्यात गोरगरिब

नागरिकांच्या घर, दुकान या सह शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानाची चौकशी करून, भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!