उमरखेडात शिंदे गटाच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक ! बैठकीत स्वबळावर कृउबासची निवडणूक लढण्याचे ठरले – श्रीधर मोहोड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती सोबत निवडणूक लढण्याचे धोरण आमचे असून यामध्ये जर आम्हाला योग्य स्थान मित्र पक्षांनी दिले नाही तर आम्ही स्वबळावर आगामी सर्व निवडणुका लढू असे संकेत शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीधर काका मोहोड यांनी आज स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांसमोर दिले आहे.
आज तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हाध्यक्ष श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून या बैठकीत उमरखेड तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर 31 मे रोजी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली . यामध्ये कार्यकर्त्यांनी भाजप नेते नितीन भुतडा हे मनमानी कारभार करीत असून युतीच्या घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी नजर अंदाज करीत आहेत त्यामुळे आपण ही निवडणूक स्वबळावर लढावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर मोहोड यांच्यासमोर शिंदे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली .मात्र मोहोड यांनी अजून बराच वेळ शिल्लक असून महायुती संदर्भात बैठक होणार असून त्या बैठकीत आपण माझ्या कार्यकर्त्यांची भावना ह्या त्यांच्यासमोर मांडून कृउबास निवडणूकीत जास्तीत जास्त जागा मागू असे आश्वासन दिले त्यामुळे येत्या काही दिवसात महायुतीचे कृउबास निवडणूकीत चित्र स्पष्ट होणार आहे .
यवतमाळ जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड
तालुका प्रमुख प्रविन पाटील मिराशे , तालुका प्रमुख संतोष जाधव , शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव , रविकांत रुडे , कैलास कदम , अनिल नरवाडे , संदिप ठाकरे , विकास मुलंगे , अविनाश जाधव , विनायक मरडकर , सुनिल शहाणे , जसबीन घनघाव, बसवेश्वर क्षिरसागर , राजु गायकवाड , दामोदर इंगोले , महिला शहर प्रमुख सपना चौधरी , सारिका कोकांडे , अंकुश राठोड , श्रीपाल आडे , अनंतराज अमृते
आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .