खरा स्वच्छता दूत शंकर बावणे

,
प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत कचऱ्याचे ढीग व घाणीचे साम्राज्य पसरत आहे.खरा स्वच्छता दूध म्हणून घेण्याची पात्रता कुणाची असेल तर महागाव शहरात नगरसेवकाचे पती शंकर बावणे (आचारी )हे होत.
आपल्या प्रभागात व इतर घाणीचे साम्राज्य पसरले असताना नगरपंचायत कर्मचाऱ्यांची वाट न बघता स्वतः आधी नालीतील घनकचरा सफाईला त्यांनी महत्त्व दिले महागाव नगरपंचायत मध्ये सात महिन्यापासून टेंडर कालावधी संपल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे .त्यानंतर कुशल अकुशल नाली सफाई कामगार यांना ठेकेदाराने पैसे न दिल्यामुळे कामगार मिळणे कठीण झाले .अशा परिस्थितीत पसरलेल्या घाणीमुळे रोगराची साथ पसरू शकते त्यावेळेस स्वतः झाडू ,फावडे ,घेऊन गाजावाजा न करता साफसफाई केली .रस्त्याने झाडू घेऊन फिरणारे स्वच्छता करू शकतात का ?त्याला स्वच्छता अभियान म्हणावे का ?खऱ्या अर्थाने कुठलेही गाजावाजा न करता नालीसफाई करणाऱ्याला स्वच्छता दूध म्हणण्यास हरकत नाही. त्यांनी स्वतः आधी उत्कृष्टपणे साफसफाई चे कार्य केले त्यामुळे महागाव शहरात त्यांनी स्वच्छतेबाबत युवकांना कसलाही प्रकारचा लहानपणा न वाटू देता आपल्या परिसरातील स्वच्छता आपण केली पाहिजे हे संत गाडगेबाबा चे विचार अंगी करण्याचा खरा मंत्र युवकांना दिला त्यामुळे स्वच्छता दूत म्हणून शंकर बावणे महागाव शहरात कौतुक होत आहे.