Uncategorized

पांदण रस्ते मोकळे करा अशा आदेशाला महागाव तहसीलदार अंमलबजावणी करतील का ?


प्रतिनिधी संजय नागरगोजे


महसूल मंत्री यांनी शेतकऱ्याला शेतात जाण्याकरता रस्ते खुले करून द्या असे आदेश व परिपत्रक असताना पोलीस संरक्षण फुकट असताना महागाव चे तहसीलदार अभय मस्के यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .दिनांक 26- 5 _2025 रोजी कोठारी येथील शेतकऱ्यांनी शेत सर्वे नंबर 42/ 1 च्या धुऱ्याने पूर्वीपासून पांदन रस्ता असतातना तो रस्ता एका शेतकऱ्याने रस्ता अडवून जेसीबीच्या साह्याने खोदून दुसऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता अडथळा निर्माण केल्यामुळे कोठारी येतील शेतकरी प्रकाश रूप सिंग राठोड ,मधुकर रूपला राठोड ,संतोष रुपला राठोड ,अर्जुन राठोड ,शामराव पवार ,अर्जुन चव्हाण, संजय चव्हाण, लक्ष्मण अर्जुन चव्हाण, परशराम राठोड ,गजानन आडे ,शाम राठोड ,या शेतकऱ्यांनी दिनांक 26 रोजी तहसीलदार मस्के यांना लेखी निवेदन देऊन शेतात जाण्याकरता रस्ता मोकळा करून द्यावा असे लेखी पत्र दिले असताना तहसीलदार यांनी कोणतीही सहानुभूती न दाखवता पटवारी मंडल अधिकारी यांना पत्र न देता मंत्र्याचे आदेशाला बगल दिल्याचे दिसून येत आहे .पांदण रस्ते मोकळे करा पोलीस बंदोबस्त शेतकऱ्यांना फुकट द्या महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या आदेशाला महागाव तहसीलदाराने दखल अंदाज केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्याकरता पेरणीच्या टायमाला अडथळा निर्माण केल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यापासून वंचित झाला आहे .शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागेल का ?हा प्रश्नच निर्माण झाला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!