शैक्षणिक

जि,प,शाळा पिंपळदरी येथे पत्रकार संदेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुळावा प्रतिनिधी-:

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळदरी येथे हर घर तिरंगा घरघर तिरंगा अभियानांतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम व गणवेश वाटप पार पडला, पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा आहे,पत्रकार आपल्या लिखाणा मधून समाजातील समस्या शासन स्तरावर मांडण्याचे काम करत असतो,याची जाणीव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समिती अध्यक्ष, यांनी पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष नमो महाराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार संदेश कांबळे यांच्या हस्ते शाळेमधील ध्वजारोहणाचा मान देऊन पत्रकार संदेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी मुळावा केंद्राचे केंद्रप्रमुख
अनिल बर्डे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर मासोळकर, गावचे प्रथम नागरिक सरपंच बंडूभाऊ ढाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष ढाले, माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक अरुण ठाकरे सर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सखाराम आमटे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश देशमुख सर, पदवीधर शिक्षक श्री खंडाळे सर , फरहान मॅडम, श्री पोफाळकर सर, श्री पाठक सर बाळासाहेब येडे सर उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!