शहर

हिमायतनगर शहरात तात्काळ CCTV बसवा; ‘ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

​
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
हिमायतनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्य चौकांमध्ये तात्काळ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी ‘ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेने’ तर्फे करण्यात आली आहे.
​या संदर्भात मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम भाई खुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देण्यात आले.


​निर्दोष व्यक्तीला शिक्षा नको; पोलिसांना तांत्रिक पुरावा हवा
निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “१०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये.” सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास पोलिसांना तपासासाठी ठोस तांत्रिक पुरावे मिळतील. यामुळे खऱ्या गुन्हेगारांची ओळख पटेल आणि कोणताही बेगुनाह नागरिक नाहक कारवाईत अडकणार नाही. उमर चौक, आंबेडकर चौक आणि बाजारपेठ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे बसवणे ही काळाची गरज आहे.
​आमरण उपोषणाचा इशारा
प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन निधी मंजूर करावा, अन्यथा ‘ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेने’ च्या वतीने येणाऱ्या काळात आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा शेख खयुम व शेख मुजम्मिल व यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button