Uncategorized

महागाव नगरपंचायत हद्दीत कचऱ्याचा ढीग व घाणीचे साम्राज्य खरा स्वच्छता दूत म्हणून घेण्याची पात्रता कुणाची


तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागाव नगरपंचायत मध्ये नगरसेविकेचा पती शंकर बावणे स्वतः करतो वार्ड मध्ये साफसफाई! खरा स्वच्छता दूत म्हणावे का? महागाव मध्ये कचऱ्याचे ढीग पडलेले आहे . घाणीचे साम्राज्य पसरले आहे.रोगराईची साथ येऊ शकते .अशा परिस्थितीत झाडू घेऊन, गाजा वाजा करत रोडने फिरणारे स्वच्छता करू शकतात का? त्यालाच स्वच्छता अभियान म्हणावे का ? खऱ्या अर्थाने कुठलाही गाजावाजा न करता नाली सफाई करणाऱ्याला स्वच्छता दूत म्हणण्यास अर्थ वाटेल अखेर कचरा टेंडरला मुहूर्त मिळाला 27 तारखेला कचरा टेंडर ओपन करण्यात आले .त्यामध्ये पाच लोकांनी टेंडर भरण्यात आले होते .परंतु कचरा टेंडर कोणाला मिळाले कोणाचे टेंडर पास झाले हे गुलदस्त्यात आहे .कचऱ्याचे ढिगारे महागाव शहरात तहसील जवळ, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ,व पंचायत समितीच्या गेटला, डंपिंग ग्राउंड चे स्वरूप आले आहे .तरी नगरपंचायत चे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना कचरा डेपो दिसत नाही ही मोठी शोकांतिका झाली आहे. मे महिन्यात अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे घाणीचे ढिगारे जागोजाग पडल्यामुळे शहरवासीयांना रोगाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी कुशल-अकुशल ठेका घेऊन साफसफाई चे कामगार यांना पगार ठेकेदाराने न दिल्यामुळे कामगार मिळणे कठीण झाले आहे. नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष कर्मचारी यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ ही व्यथा मांडली आहे .त्यामुळे व्यापारी वर्गात नगरपंचायत च्या कारभाराबाबत उलट सुलट चर्चा ला उदान आले आहे .लवकरात लवकर कचरा उचलून नाल्या साफ कराव्या अशी मागणी महागावातील नागरिक करीत आहे. न केल्यास घरात पाणी घुसायला वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत
सत्ताधारी काँग्रेसचे गटनेता हे विधानसभा मध्ये पडलेले उमेदवार यांना घेऊन महागाव मध्ये वाढदिवस, व वास्तु ,साजरा करताना सोशल मीडियावर फोटो दिसत आहे त्यामुळे चौका चौकात हीच चर्चा ऐकायला मिळत आहे. महागाव चा विकास कधी होणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!