हादगाव तालुक्यातील भूमी कन्या सूर्यकांता ताई पाटील यांच्या प्रयत्नाला यश

नांदेड वर्धा रेल्वे मार्गा गती
रेल्वे पट्टी चे काम युद्धपातळीवर सुरू2027 पर्यंत काम पूर्ण होणार
हादगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
नांदेड ते वर्धा रेल्वे कामासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे आता पुसद ते नांदेड दरम्यान सपाटी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे हदगाव तालुक्याची भूमी कन्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या पाठपुराव्याला आले आहे यश 2006 मधे तात्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती हादगाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे गत 14 वर्षापासून प्रलंबित असलेला हा राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या वर्धा यवतमाळ नांदेड नागपूर रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 850 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे केंद्र सरकारने 2023 24 या वर्षातील अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामासाठी 13 हजार 5. 36कोटीचा निधी दिला आहे महाराष्ट्रात आतापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठा निधी आहे या संदर्भात उमरखेड येथे रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांची 3 ऑगस्ट रोजी बैठक संपन्न मुंबई येथे सेंट्रल रेल्वेच्या झेड आर यु सी सी सी मेंबर सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर राम यादव आणि सेंट्रल रेल्वेचे डीजीएम अभय मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली या रेल्वे लाईनचे प्रोजेक्ट मार्च 2027 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे जी एम यांनी दिली या दृष्टिकोनातून संपूर्ण रेल्वे लाईनचे काम नियोजित पद्धतीने होत आहे