बाबुराव कोहळीकर यांच्या प्रयत्नाला आले यश

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे बाबुराव कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील इ पीक पाहणी केलेल्या काही शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळालेली नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांना नव्याने पात्रता यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची दखल घेतली असून कृषी विभागाला चौकशीचे आदेश दिले आहे सन 2023 मध्ये सोयाबीन कापूस उत्पादक हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल द्वारे कापूस सोयाबीन पिकाची नोंद केल्याचे आढळून येत आहे पण शासनाने निर्गमित केलेला अर्थसहाय्य यादीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनाही ई पीक पाणी करून सुद्धा त्याचे नाव संबंधित यादीमध्ये नसल्यामुळे त्यांचे नाव अर्थसाह्य पात्रता यादीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात यावेत व समाविष्ट करून शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा असे आशयाची निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकनेते शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी दिली असून या निवेदनाला लगेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी हादगाव हिमायतनगर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलेली आहे त्यांची सविस्तर चौकशी करून त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अर्थसहाय्य यादीमध्ये समाविष्ट करण्याचे कृषी विभागाला आदेश दिले आहेत