शहर

अवकाळी पावसाचा फटका; पिंपरी शिवारात गव्हाचे मोठे नुकसान


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आज महागाव परिसरात अचानक वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने पिंपरी शिवारातील शेतकरी जगदीश नरवाडे यांच्या गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक आडवे झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.
परिसरातील इतर कष्टकरी शेतकऱ्यांच्या गहू व हरभरा पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, जेणेकरून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button