Uncategorized

हदगाव तालुक्यात माय लेकीला आमदार बनवणारा हा पहीला तालूका

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर

नांदेड : राजकारणात बाप-लेक आमदार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र नांदेडमध्ये मायलेकी आमदार झाल्याचं महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव या मतदारसंघात हा दुर्मीळ योग घडून आला होता. मायलेकी आमदार होण्याची ही राज्यातील एकमेव घटना आहे.

नांदेड जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील जयवंतराव पाटील निजामाशी लढताना हुतात्मा झाले होते. तर त्यांचे आजोबा माधवराव पाटील 1951 साली हदगाव मतदारसंघातून निवडून आले होते.

त्यावेळी नांदेड हे निजाम स्टेटमध्ये सहभागी होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. माधवराव पाटील यांचा वारसा पुढे अंजनाबाईनी पुढे नेला.

1957 साली निजाम स्टेटच्या दुसऱ्या निवडणुकीत अंजनाबाई हदगाव मधून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी श्यामराव बोधनकर यांचा पराभव केला होता.

अंजनाबाईंनंतर त्यांची लेक सुर्यकांता पाटील यादेखील प्रदीर्घ कालावधीनंतर हदगाव मधूनच विधानसभेत पोहचल्या होत्या. पुढे याच सूर्यकांता पाटील हिंगोली लोकसभेतून देखील निवडणूक जिंकत केंद्रीय राज्यमंत्री बनल्या होत्या.

संपूर्ण राज्यात मायलेकींना आमदार म्हणून निवडून देण्याचा विक्रम हदगाव मतदारसंघात घडला होता. राज्यातील या दुर्मिळ घटनेची अद्याप तरी कुठेही पुनरावृत्ती झालेली नाही. महिला सक्षमीकरणाच्या इतिहासात हा विक्रम एक सोनेरी किस्सा म्हणून नोंद आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!