वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन या समितीद्वारा भारत देशातर्फे कार्तिक राठोड यांची आशियाई राष्ट्र कंबोडिया साठी निवड

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
प्रसिद्ध राठोड कोचिंग क्लासेस नांदेड चे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे नेते प्राचार्य कैलास राठोड सर यांचे चिरंजीव कार्तिक राठोड हा एमबीबीएस कोर्स साठी लातूर येथे शिकत आहे बालपणापासून खेळाडू वृत्ती असल्यामुळे कार्तिक राठोड हा शालेय स्तरावर विविध खेळात भाग घेत आहे असे पुढे एमबीबीएस व कोर्स करत आहे त्यांना कीक बॉक्सिंग ची आवड निर्माण झाली जिल्हा पातळीवर त्यांनी अनेक सुवर्णपदक जिंकले पुढे राज्यस्तरावर देखील त्यांनी सुवर्णपदक पटकाविले नुकताच गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत त्याला कास्य पदक मिळाले या सर्व स्तरावरील याच्यानंतर वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन या समितीद्वारा भारत देशातर्फे त्यांची निवड अशियाई राष्ट्र कंबोडिया येथे झाली ही स्पर्धा सहा ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान कंबोडिया येथे पार पडणार आहे या अभूतपूर्व यशाबद्दल कार्तिक राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यास पुढील कार्यास भारतवासी कडून तर्फे शुभेच्छा