बंदिस्त असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा खुला करून तात्काळ बसवा – समस्त शिवप्रेमी

(इशारा – अन्यथा भव्य जन आंदोलन करण्यात येईल)
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड (दि. ९ जुलै) बंदिस्त असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा खुला करून तात्काळ बसविण्यासाठी दि. २२/७/२०२४ रोजी भव्य जनआंदोलन करत येईल असा इशारा नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदनामार्फत समस्त सकल शिवप्रेमी उमरखेड तालुका व शहर यांच्या कडून देण्यात आला.
मागील ३ वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उमरखेड नगर परिषदेने कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध नसतांना तत्कालीन सत्ताधा-यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरामध्ये आणुन नगर परिषद मधील अग्नीशामकाच्या गॅरेज मध्ये ७ फुट खोल खडडा करून बंदिस्त करून ठेवलेला आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना आहे त्यामुळे मागील ३ वर्षापासुन सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत परंतु आता आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही.
आम्ही मागील बरेच आंदोलने व निवेदन दिली परंतु सदर जागा ही कोर्टात आहे त्यामुळे सदर जागेवर सध्या छत्रपतींचा पुतळा बसविता येणार नाही अशी दिशाभुल करण्याचा प्रयत्न आपल्या नगर परिषद प्रशासनाकडुन वांरवार होत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासाठी ४००० चौ. फुट जागा उपलब्ध आहे व त्यापैकी ८०० चौ. फुट जागेचे न्यायालयीन प्रकरण सुरू असुन ती जागा आज रोजी कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे परंतु नगर परिषद कडे असलेल्या प्रस्तावित नकाशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा सदर ८०० चौ. फुट जागा सोडुन मागील बाजुस असलेल्या ३२०० चौ. फुट मध्ये आहे व जागा आज रोजी कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन वादात नाही त्यामुळे ३२०० चौ. फुट जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा.
तसेच दि. २१/७/२०२४ रोजी बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमीसाठी नेहमीसाठी खुला करावा तसेच चबतु-याची कामाची निवीदा काढण्यात यावी.
अन्यथा दि. २२/७/२०२४ रोजी बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खुला करण्यासाठी भव्य जनआंदोलन करण्यात येईल व यामध्ये काही कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील. असे लेखी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी सचिन घाडगे, गजानन देशमुख,शेख इरकान,शेख नदीम, ज्ञानेश्वर लोखंडे, सुनिल कवडे,अभय पवार,उमेश कदम,बबलु भालेराव, सिध्दार्थ दिवेकर, शामभाऊ धुळे, गजेंद्र ठाकरे, दीपक कांबळे,परिमल चिंचोलकर, राजु वानखेडे, राहुल बोले,विठ्ठल वाघमारे,शुभम कदम,गोपाल झाड,अनिकेत ताजवे,अविनाश जाधव, विश्वास वानखेडे, शेख जमीर, गुलाबराव सूर्यवंशी, राहुल मोहितवाड, शाम चैके, अंकुश पानपट्टी, गणेश रावते इत्यादी अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.