Uncategorized

सरपंच संतोष देशमुख च्या मारेकऱ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करून फरार आरोपीला अटक करा

धंनजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा त्वरित राजीनामा द्यावा

उमरखेड येथील मराठा आंदोलका तर्फे नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स चढून केले आंदोलन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- दीड महिन्यापूर्वी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांना निर्घूणपणे मारून त्यांची हत्या केली . विकृत सहा माणसांनी सरपंच संतोष देशमुख यांचे शरीर छिन्नविच्छिन्न करून टाकले यासंदर्भात अनेक मारेकऱ्यांना अटक झाली परंतु त्यामध्ये खंडणी प्रकरणी अटक केलेले वाल्मीक कराड व एक फरार आरोपी यांच्यावर अजूनही ३०२ व मकोकांतर्गत गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा या मागणीसाठी उमरखेड येथील उपोषण करते व मराठा आंदोलक सचिन घाडगे, सरोज देशमुख, शरद मगर, गोपाल झाडें, गजानन देशमुख,चांदराव सुरोशे,नितीन शिंदे यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळून देण्यासाठी गांधी चौकातील नगरपालिकाने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संकुलावर जाऊन एक ” मराठा लाख मराठा,” संतोष देशमुख यांच्या फरार मारेकऱ्यांना अटक करा ” अशा घोषणा दिल्या . तसेच या प्रकरणी खंडणी प्रकरणी अटक केलेले वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या मंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली . मकर संक्रांतीच्या दिवशी ते आंदोलन केल्यामुळे प्रशासनाची धांदल गिरी उडाली यावेळी ठाणेदार शंकरराव पांचाळ यांनी आंदोलनकर्त्याची समज काढून वरिष्ठ कडे आपले निवेदन देण्यात येईल अशी आम्ही आश्वासन दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!