पोलीस ठाणे महागांव हद्दीतील दरोडयाचे गुन्हयात अधिक ०२ आरोपीतांना केली अटक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पो. ठाणे महागांव यांची संयुक्त कारवाई

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798386192
दिनांक ०८/०६/२०२४ रोजी रात्री दरम्याण पोलीस ठाणे महागांव हद्दीतील ग्राम चिल्ली ईजारा गोकुळवाडी शेतशिवारात राहणारे संतोषकुमार मनोहर पांडे यांचे घरी अज्ञात सहा ते सात आरोपीतांनी संतोषकुमार पांडे व त्यांचे कुटुंबीय यांना मारहाण करुन दरोडा टाकला होता व नगदी रक्कम व सोन्याचांदीचे दागीने असा एकुण ३३,५०,००० रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. सदर प्रकरणी संतोषकुमार पांडे यांनी दिनांक ०९/०६/२०२४ रोजी पो.स्टे. महागांव येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्रमांक ३८८/२०२४ कलम ३९७ भादवि प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला होता.
सदर दरोड्याचा गंभीर प्रकार लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणने करीता आदेशीत केले प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडून दिनांक २१/०६/२०२४ रोजी सदरचा गुन्हा उघडकीस आणुन ०२ आरोपीतांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हयातील फरार आरोपीतांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांकडुन सुरु होता. अशातच गुन्हयातील काही आरोपी हे मुंबई येथे असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली होती त्यावरुन स्था.गु.शा. कडील पचक मुंबई येथे तळ ठोकून आरोपीतांचा मागोवा घेत असतांना पथकास माहिती मिळाली की, आरोपी १) चंदु लक्ष्मण राऊत वय ३० वर्षे. २) राजु भिमराव देवकर वय २८ वर्षे, दोन्ही रा. किनवट गंगानगर जि. नांदेड हे धोबीघाट उल्हासनगर येथे नातेवाईकांस भेटण्याकरीता येत असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली त्यावरुन पथकाने पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने सदर परिसरात सापळा रचुन दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेतले. नमुद आरोपी १) चंदु लक्ष्मण राऊत वय ३० वर्षे, २) राजु भिमराव देवकर वय २८ वर्षे, दोन्ही रा. किनवट गंगानगर जि. नांदेड यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन महागांव यांचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, श्री. पियुष जगताप, श्री. हनुमंतराव गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड, श्री. ज्ञानोबा देवकते, पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ, श्री. धनराज निळे, पोलीस निरीक्षक. पो.स्टे. महागांव यांचे मार्गदर्शनात पोउपनि शरद लोहकरे, पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार, रमेश राठोड स्था.गु.शा. यवतमाळ व पोलीस स्टेशन महागांव येथील पोउपनि सागर अन्नमवार, पोलीस अंमलदार संतोष जाधव, चालक अंमलदार शेख हवीब यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.