Uncategorized
रोटरी क्लब उमरखेड व्दारा बस स्थानकावर (शितजल) पाणपोईचे उद्घाटन.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
स्थानिक बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आल्याने उदांत हेतू उराशी बाळगून विनोद सारडा व दत्तात्रय दुर्केवार यांनी लाखो रुपये खर्च करून प्रवाशांची तहान भागविण्या करिता मातृत्वाचीओळख म्हणून या कुटुंबांनी समाजासाठी काही देणे घेणे लागते ही एक ओळख निर्माण करून गोरगरिबाची कष्टकरी प्रवाशांची तहान भागविण्या करिता उमरखेड बस स्थानकात शितजल थंड पेय पानपोहीचे उद्घाटन करून आपली वेगळी आगळी ओळख निर्माण केली.
प्रवाशांना पाणी पिण्यासाठी बस स्टॅन्ड ला कोणतीच सुविधा नसल्याने पाण्यासाठी त्यांना हॉटेलवर नाही तर विकत पाणी बॉटल घेऊन प्यावे लागत असल्याने प्रवाशी त्रासून गेले होते ह्याच दृष्टीने आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके यांना रोटरी क्लब तर्फे सर्व बाबी समजावून सांगण्यात आल्या त्या दृष्टिकोनानुसार आगार प्रमुखांनी सहकार्य केले शितजल थंडपेय पानपोई च्या उद्घाटनाप्रसंगी माजी आमदार विजयराव खडसे,दत्ता गंगासागर ,चेतन माहेश्वरी, डॉक्टर कुणाल काळे , राम सारडा, विशाल दुर्गमवार, संदीप अग्रवाल, वसीम भाई ,दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष डॉ. विशालराव माने योगेश देशमुख , चेतन जाधव, चंद्रकांत अश्टुरकर , भरत वाठोरे, मारोती कांगणे बाबू , सुवर्णा मार्कड, दत्तात्रेय उगले, लक्ष्मी चनेबोईवाड प्रवासी तथा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.